बेंगळूर/प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी केरळ माकपचे राज्य सचिव बाळकृष्णन कोडियरीयांचा मुलगा बिनेश कोडियरी याला अटक केली. बेंगळूरमधील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग रॅकेटच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका मोहम्मद अनूप या व्यावसायिकाशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. ऑगस्टमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झालेल्या बिनेशला अटक करण्यापूर्वीच तीन तासांची सखोल चौकशी करण्यात आली. त्याला कोर्टासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी चार दिवसांची कोठडी घेण्यात आली.
अटक केलेल्या पेडलर्सच्या आर्थिक खर्चाची चौकशी करीत असलेल्या ईडीला दिलेल्या निवेदनात मोहम्मद अनूप यांनी म्हटले होते की, बिनेशने बेंगळूरमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ड्रग विक्रेता अनुपला ५० लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी बोलावण्यास सांगितले. यावेळी बिनेशने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, अनूपला मदत करण्यासाठी त्याने एका मित्राकडून कर्ज घेतले होते, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्याला पैशांविषयीचे दावे सिद्ध करण्यास सांगितले आणि त्याला वेळ दिला पण तो सिद्ध करण्यास अपयशी ठरला, असे सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये बिनेशवर गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट महिन्यात कर्नाटकात अमली पदार्थांच्या गोळ्याच्या रॅकेटचा भडका उडाल्याचा दावा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने केला होता.









