बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर क्राइम ब्रँचने (सीसीबी) शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या नायजेरियाच्या दोन ड्रग पेडर्सना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचे कोकेन व एक्स्टसी जप्त केले आहे. दरम्यान राज्यात ड्रग्जचे विस्तृत जाळे पसरले आहे. या आधीही नायझेरियन ड्रग पेडर्सना अटक करण्यात आली आहे.
सीसीबी पोलिसांनी याप्रकरणी काही लोकांना अटक केली आहे. कन्नड चित्रपट सृष्टीत होणारी ड्रग्ज तस्करी आणि सेवन प्रकरणी सीसीबीने कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा तपास चालू आहे. ज्यामध्ये काही चित्रपट कलाकारांना अटकही करण्यात आली. या प्रकरणात सीसीबी मुख्य सूत्रधाराला शोधत आहेत.









