बेंगळूर/ प्रतिनिधी
बीबीएमपीचा पाच वर्षांचा कार्यकाळ गुरुवारी संपला. त्यामुळे प्रशासक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी गौरव गुप्ता यांनी बृह बेंगळूर महानगर पालिकेच्या प्रशासकीय पदाची सूत्रे स्वीकारली. सध्याच्या बीबीएमपीची पाच वर्षांची मुदत गुरुवारी संपल्याने ते प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
गौरव गुप्ता हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते सध्या वाणिज्य व उद्योग खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत.