बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकार चिंतेत आहे. दरम्यान, कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. तर बेड आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण मरण पावले आहेत. दररोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे बऱ्याच रूग्णांना बेड मिळू शकत नाही. राज्यात एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र काही लोक पैसे घेऊन कोविड रूग्णांसाठी बेड राखून ठेवतात आणि बाकीच्यांना नकार दिला जातो. आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णांना बेड दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काही ज्यांना अटकही केली आहे. आता या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. अँथनी नावाच्या व्यक्तीला बेड प्रकरणात अटक करण्यात आली आहे, जो सप्तगिरी रुग्णालयात काम करतो. तो ज्यांच्याकडे पैसे आहेत. अशा रुग्णांना बेडचे वाटप करत असे.
बेंगळूर येथे सप्तगिरी रुग्णालयात विपणन कार्यकारी म्हणून काम करणाऱ्या अँथनीला अटक केली असून. रुग्णांना बेड्स वाटण्यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २ जण # COVID19 पॉझिटिव्ह आहेत, एकूण १० जणांना अटक केली आहे. अशी माहिती जॉइंट सीपी (गुन्हे) शाखा यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना जॉइंट सीपी (गुन्हे) यांनी सांगितले की अँथनीला अटक करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत दहा लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तक्रारीच्या आधारे बेड वाटपात होणार भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत.









