बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये दररोज कोविड -१९ रुग्णांचीसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात दररोज २० हजार पर्यंत कोरोना प्रकरणे नोंदविली जात आहेत. कोरोना चाचणी अहवाल जाहीर करण्यात विलंब होत असल्याने रूग्णालयात बेड शोधण्यासाठी जास्त काळ वाट पहावी लागत आहे.
बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) खाजगी लॅबवर प्रोटोकॉलचे पालन न केल्याचा आरोप केला आहे – स्वॅब संग्रह ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) पोर्टलवर निकाल अपलोड करण्यापर्यंत राज्याच्या राजधानीतील अनेक प्रयोगशाळांनी चाचण्यांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे ताण वाढत असल्योचे म्हंटले आहे.
एखाद्या रुग्णाची सकारात्मक चाचणी आल्यानंतर आयसीएमआर पोर्टलवर अपलोड केलेल्या सकारात्मक अहवालाच्या आधारे एक पेशंट कोड (पी कोड) तयार केला जातो. त्यानंतर बीबीएमपी कोविड -१९ वॉर रूम रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी बीयू कोड नियुक्त करतो.









