बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरातील कोविड रुग्णालयातील सुमारे ७० टक्के बेड रिक्त आहेत. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालये व नर्सिंग होम असोसिएशनने (पीएचएनए) राज्य सरकारला रिक्त असलेल्या बेडस शासकीय कोट्यातून हटवावेत असे आवाहन केले आहे. रुग्णालयांना हे बेड कोरोना नसलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरायच्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बेड रिक्त झाल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पीएचएनएने राज्य सरकारला रिक्त असलेल्या बेडपैकी २५ टक्के बेड देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान पीएचएनएचे अध्यक्ष डॉ. प्रसन्ना एच.एम. यांनी या संदर्भात ते आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर व इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. शासकीय कोविड रूग्णांसाठी राखीव असलेल्या ५० टक्के बेडपैकी कोरोना नसलेल्या रूग्णांसाठी वापरण्याची तोंडी परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी अधिकृत परवानगीची प्रतीक्षा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.