बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर बेंगळूरमध्ये कोरोना मृत्यू दरात मोठ्या प्रमाणात घट आणि कोरोना चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे म्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनी सप्टेंबर १९ पर्यंत बेंगळूररुमध्ये १३.२० लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या एका महिन्यात २२.९० लाख चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या महिन्याच्या तुलनेत ९.७० लाख चाचण्या वाढल्या असून मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि दिल्लीसारख्या बड्या शहरांच्या तुलनेत चाचणीत ४९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगितले.
जर चाचण्या सुरुवातीच्या टप्प्यावर घेतल्या गेल्या आणि लवकरच उपचार केले गेले तर मृत्यू दर कमी केला जाऊ शकतो. सध्या मृत्युदर १.३७ टक्के आहे आणि ते १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे आमचे लक्ष्य आहे. बेंगळूरमध्ये मृत्यु दर १.१४ टक्के आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आमचे जे काही लक्ष होते त्याच्या जवळ आम्ही पोहचलो आहे. कोरोना व्हायरस नियंत्रित आहे आणि संक्रमित व्यक्तींच्या संख्येत घट होत आहे, असे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी म्हंटले आहे.









