बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी राज्यात ५ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. राजधानीतही कोरोनाच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी बेंगळूर आयकॉनिक केआर मार्केट, कलासीपल्या बाजारपेठा 31 ऑगस्टपर्यंत बंद राहतील, असे म्हंटले आहे. प्रशासनाने कोविड -१९ च्या प्रसारानंतर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी म्हंटले आहे.