बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथील एका अपार्टमेंटमध्ये २० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर, बेलंदूर प्रभागातील अंबालीपुरा येथील एसजेआर वॉटरमार्क अपार्टमेंटमधील आणखी सहा जणांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी ५०१ नमुने गोळा करण्यात आले, त्यापैकी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.. मंगळवारी ५४४ जणांचे नामूऊने संकलन केले गेले, त्यापैकी सहा जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह व बुधवारी आम्ही ८५ नमुने गोळा केले असून त्याचे निकाल गुरुवारी उपलब्ध होतील, असे बृह बेंगळूर बेंगळूर महानगर पालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितले.
अपार्टमेंटमध्ये सुमारे ५०४ फ्लॅट्ससह नऊ टॉवर आहेत. बीबीएमपी अअधिकाऱ्याच्या माहितीनुसार एकूण पैकी केवळ ४७० सदनिका ताब्यात आहेत. यापूर्वी, बंगळुरुच्या बोम्मनहळ्ळीतील एक अपार्टमेंट कोविड -१९ हॉटस्पॉट बनली.यावेळी तपासणीनंतर १०३ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. तर १४ फेब्रुवारी रोजी कावळ बायरसंद्रच्या एका नर्सिंग कॉलेजच्या ४० विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.









