मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (एमएएचई) आपल्या संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. या लसीकरण मोहिमेत २५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.
एमएएचई प्र-कुलगुरू एच.एस. बल्लाळ यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोहीम राबविण्यास अग्रणी असल्याचे म्हंटले. कुलगुरू एम.डी. वेंकटेश म्हणाले की, कोरोनाचा धोका ओळखून विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्वरीत लसीकरण होणार आहे.
एमएएचईने यापूर्वीच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले आहे. या मोहिमेमुळे मणिपाल आणि आसपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मदत होईल. ते लसीकरणासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. इतर विद्यार्थ्यांना जेव्हा ते कॅम्पसमध्ये परत येतात तेव्हा लसीकरण केले जाईल, असे म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









