वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येमुळे एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत भारताच्या बेंगळूर एफसी संघाचा चालू महिन्यात होणारा प्लेऑफ गटातील सामना लांबणीवर टाकण्यात आला होता. आता हा सामना 11 मे रोजी खेळविला जाईल.
बेंगळूर एफसी आणि 2016 सालातील या स्पर्धेतील उपविजेता बीएफसी यांच्यातील प्लेऑफ गटातील सामना 28 एप्रिल रोजी आयोजित केला होता. आता सदर सामना 11 मे रोजी होणार आहे. बेंगळूर एफसी संघाला ड गटातील या सामन्यासाठी पुढील महिन्यात मालदिवला प्रयाण करावे लागेल. या सामन्याचे यजमानपद मालदीवच्या क्लब इगल्स भूषविणार आहे. सदर माहिती आशिया फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या प्रवक्त्याने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे या स्पर्धेतून मॅनमारच्या हेन्टरवेडी युनायटेड एफसी आणि शान युनायटेड एफसी संघाने माघार घेतली आहे.









