बेंगळूर/प्रतिनिधी
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गुरुवारी बाऊरिंग आणि लेडी कर्झन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएलसीएमसी आणि आरआय) यांना दोन रुग्णवाहिका दान केल्या.
एचएएलने म्हंटले आहे की, या खास रूग्णवाहिकांचा उपयोग संक्रमण आणि वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असलेल्या रूग्णांच्या वाहतुकीसाठी करता येऊ शकतो.
या रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये वातानुकूलन, मूलभूत जीवन समर्थन प्रणाली, एनालॉग ऑक्सिजन वितरण प्रणाली आणि फ्लोर माउंटिंग मेकॅनिझिकमसह ऑटो-लोडर स्ट्रेचर ट्रॉली यासारख्या सुविधा आहेत.