बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने शुक्रवारी वरिष्ठ आयएएस अधिकारी राकेश सिंह यांची बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली. “अजय सेठ यांची बदली झाल्यानंतर राकेश सिंह यांना या पदाचा समकालीन प्रभार सोपविण्यात आला आहे.
दरम्यान जलसंपदा विभागाचे विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव राकेश यांना राज्याची राजधानी असलेल्या बृह बेंगळूर महानगर पालिकेचे प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.









