बेंगळूर/प्रतिनिधी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (आयआयएससी) विकसित केलेल्या शहरातील आरटी-पीसीआर कोविड -१९ प्रयोगशाळा बुधवारी शहरात सुरू करण्यात आली. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी या सुविधेचे उद्घाटन केले.
यानंतर मंत्री सुधाकर यांनी भारतातील आयसीएमआर-मान्यता प्राप्त प्रथम मोबाइल आरटी-पीसीआर कोविड -१९ चाचणी प्रयोगशाळा असल्याचा दावा केला आहे. ही प्रयोगशाळा दरमहा ९ हजार चाचण्या घेण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले.
तसेच सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही एक अद्वितीय प्रयोगशाळा आहे आणि चार तासात शंभर टक्के अचूक परिणाम देण्यास सक्षम आहे, असेही ते यावेळी म्हणाले.