बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना राज्य सरकार कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. राज्यसरकारकडून लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयआयएम-बेंगळूर माजी विद्यार्थी संघटनाच्या #डोनेट एव्हॅक्स उपक्रमाचे कौतुक केले आहे. #डोनेट एव्हॅक्स उपक्रमांतर्गत १ लाख लाभार्थ्यांना लसी देण्याचे कौतुक केले.
अर्थमंत्री सीतारामन यांनी “कोरोनाचा बर्याच लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे.” “रीबूटिंग, रीमॅजिनिंग आणि’ ’भारत पुन्हा जोडण्याचा’ ’त्रिमुखी दृष्टीकोन देण्यासाठी आपण हात जोडले पाहिजेत. “पहिल्या लॉकडाऊन ते आता पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटरची निर्यात करण्यापर्यंतचे प्रमाण आता भारताने वाढले आहेत,” त्या म्हणाल्या की, देशात खासगी भागीदारीसह आरोग्याच्या चांगल्या पायाभूत सुविधांवर आता भर देण्यात आला आहे. “लस आणण्यात खासगी क्षेत्राचा मोठा वाटा आहे आणि सरकारची भूमिका ही महत्वाची आहे.” असे त्या म्हणाल्या.









