बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपटसृष्टीत ड्रग रॅकेटमध्ये सहभाग आणि राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या ड्रग तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्नड चित्रपट अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सोमवारी रागिणी हिला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, रागिणी परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात असणार आहे. चित्रपट निर्माता इंद्रजित लंकेश यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यतील पोलीस यंत्रणा गतिमान होत ड्रग्स रॅकेट प्रकरणी कारवाईला सुरुवात केली.
या प्रकरणात पोलिसांनी बर्याच लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना गलराणी, पार्टी संयोजक वीरेन खन्ना, माजी मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा, आदींसह अनेकांना अटक केली आहे. अटक केलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी बऱ्याच जणांची चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.









