बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरच्या सुमारे २८.६ टक्के लोकसंख्येला लस देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. “बेंगळूरची लसीकरण मोहीम ही भारतातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. ते म्हणाले, “ जिल्ह्यातील २८.३ लाखाहून अधिक नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. तर शहरातील २८.६ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.”
दरम्यान, मंत्री म्हणाले की, जून महिन्यात कोरोना लसीचे ५८.७१ लाखाहून अधिक डोस पुरविले जाणार आहेत, ज्यात केंद्राकडून ४५ लाख डोस आणि राज्य सरकारच्या थेट खरेदीतून १३.७ लाख डोसचा समावेश आहे.









