बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री अरविंद लिंबावळी यांनी बेंगळूर येथे २५० बेडचे नवीन सरकारी रुग्णालय बांधले जाईल, अशी माहिती दिली. दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने वेळेत उपचार होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
“राज्यातील कोविड -१९ टास्क फोर्स बेंगळूरमध्ये अधिक रुग्णालये बांधण्यासाठी विचारणा करीत आहे. सरकारी रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होईल, ”असे मंत्री अरविंद यांनी म्हंटले आहे. त्यांच्या मते, या रुग्णालयात मुलांसाठी खास वॉर्ड आणि प्रसूती वॉर्ड असेल. तसेच जिल्हा रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असतील, असेही ते म्हणाले.









