बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी बेंगळूरमध्ये दुसर्या कोविड लहरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण दुप्पट करण्याचे निर्देश विभागीय आरोग्यअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. “सध्या शहरातील ३५ हजार नागरिकांना दररोज लसीकरण केले जात आहे. कोविड -१९ विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीबीएमपी अनेक उपाययोजना करीत आहे,” असे ते म्हणाले.
विशेष आयुक्त, सहआयुक्त व आरोग्य आयुक्तांसह कोविड निकषांचे पालन, लसीकरण आणि चाचणी या विषयीआढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गौरव गुप्ता यांनी, शहरातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे. “आशा कर्मचार्यांना लसीसाठी पात्र असणाऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना लसी देण्यास प्रोत्साहित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, लसीकरण दराची वाढ दुपटीने होईल कारण उद्या २ लाख लसी दाखल होतील,” अशी माहिती त्यांनी दिली.