बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगरपालिकेने कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोना केंद्रांवर मदत करण्यासाठी प्रयोगात्मक आधारावर शहरभरात प्रशिक्षित ११ महिला मार्शल तैनात केल्या आहेत.
कोरोना साथीचा फैलाव सुरु झाल्यापासून, बीबीएमपीने शहरात कोरोना प्रोटोकॉलचे केले जाते की नाही याची खात्री करण्यासाठी २३० हून अधिक पुरुष मार्शल तैनात केले आहेत. घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती मास्क लावत आहेत की नाहीत आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन करत आहेत का नाहीत हे पाहून कारवाई करत आहेत. तसेच रस्ते आणि बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी गस्त घालण्यासाठीही मार्शलना माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान बीबीएमपीने प्रथमच प्रायोगिक तत्वावर ११ महिला मार्शल तैनात केले आहे. बीबीएमपीचे मुख्य मार्शल अधिकारी कर्नल राजबीर सिंग यांनी याविषयी माहिती देताना, पुरुष मार्शल प्रमाणेच त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला मार्शल पथक निवडक प्रसूतिगृह, कोविड केअर सेंटर, ट्रायजिंग आणि स्टॅबिलायझेशन सेंटर येथे तैनात केले जातील.









