बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर के. यांनी बुधवारी बेंगळूरमध्ये आणखी एक राष्ट्रीय विज्ञान संस्था (एनआयव्ही) प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी केंद्राने ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगितले.
नवीन एनआयव्ही प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केंद्राला पत्र लिहिले होते. शहरातील जीकेव्हीके परिसरातील प्रयोगशाळेसाठी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बेंगळूरसाठी ही आणखी एक प्रतिष्ठित बाब ठरणार आहे, असे सुधाकरयांनी म्हंटले आहे.









