बेंगळूर/प्रतिनिधी
अचानक आलेल्या आदेशाला शहर पोलिसांनी बसवराज बोम्मई यांना जबाबदार धरले. आज दुपारी १२ वाजल्यापासून बेंगळूरमध्ये जमावबंदी लागू केली आहे.
दरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही फक्त गृहमंत्री यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आहे. पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक आदेशांचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरा करणे थांबविणे आहे. याचा पब आणि बारच्या कामांवर परिणाम होणार नाही.
आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी कलम १४४ चे समर्थन करतांना अचानक निर्णयात बदल केल्याचा अर्थ असा नाही की विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते नागरिकांच्या हिताचे आहे, असे ते म्हणाले.
परंतु पब आणि हॉटेलच्या मालकांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की एकीकडे रात्री ११ वाजेपर्यंत पब खुला ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर दुपारपासूनच कलम १४४ लागू केलं आहे, मग लोक कसे येतील, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.









