बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी ज्या ठिकणी कोरोना लसीचा साठा ठेवला आहे त्या रुग्णालयात जाऊन पाहणी केली. दरम्यान मध्य बेंगळूर येथील दसप्पा रुग्णालयात सुमारे १.०५ लाख कोविशील्ड लस डोस साठा केला आहे. १६ जानेवारीला कोरोना लसीकरण होईल. यासाठी शहरातील सहा केंद्रांमधून आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण केले जाईल.
केसी जनरल हॉस्पिटल, व्हिक्टोरिया हॉस्पिटल, सीव्ही रमण जनरल हॉस्पिटल, जयनगर जनरल हॉस्पिटल, सेंट जॉन मेडिकल कॉलेज आणि उत्तर बेंगळूरमधील मल्लासंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकणाहून लसीकरण केले जाणार आहे. ही लस 16 जानेवारी रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ दरम्यान दिली जाईल.
आयुक्त प्रसाद यांनी त्या दिवशी प्रत्येक केंद्रातील १०० लोकांना ही लस दिली जाईल आणि ज्यांना प्रथम लस देण्यात येणार हे त्यांना एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे कळवले जाईल, प्रसाद म्हणाले.









