बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथे शुक्रवारी सकाळपर्यँत शहरातील सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नऊ आयसीयू बेड व इतर सहा आयसीयू-व्हेंटिलेटर बेड्स शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची कमतरता भासत आहे. बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार ३६९ आयसीयू आणि३३५ आयसीयू-व्हेंटिलेटर बेड ताब्यात घेतले गेले आहेत. बेंगळूर (शहरी व ग्रामीण) येथील सरकारी आणि खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील कोविड -१९ रूग्णांसाठी राखीव असलेल्या ७,८१६ बेडपैकी ६,४०७ बेड ताब्यात घेण्यात आले आहेत.
बुधवारीपासून या रुग्णालयांमध्ये तब्बल ७३८ बेडची भर पडली आहे. दरम्यान बीबीएमपी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक रूग्णांच्या प्रवेशासाठी बेडची संख्या वाढवावी, असे म्हंटले आहे. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी, “येत्या काही दिवसांत एकूण ११ हजार बेड मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हंटले आहे.









