बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी बेंगळूरने २ लाखाहून अधिक कोरोना बाधितांचा टप्पा ओलांडला आहे. दोन लाखाहून अधिक रुग्ण असलेले बेंगळूर हे देशातील तिसरे शहर ठरले.
मंगळवारी कोरोनाचे तीन हजाराहून अधिक रुग्ण सापडल्याने बेंगळूरने दोन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला. केवळ पुणे आणि दिल्लीमध्येच कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची जास्त आहे.
दरम्यान दिल्लीपेक्षा बेंगळूरमध्ये कोरोनाची जास्त सक्रिय प्रकरणे आहेत. शहरात आता सक्रिय प्रकरणांची संख्या ४० हजारावर पोहोचली आहे. केवळ पुण्यातच जवळपास ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आहेत. बेंगळूर येथे ऑगस्टपासून प्रत्येक दिवसात दोन ते तीन हजार घटना घडत आहेत परंतु गेल्या दहा दिवसांत ही संख्या जवळपास तीन हजारांवर पोहचली आहे. कर्नाटकातील एकूण संक्रमित रुग्णांपैकी ३७ टक्क्यांहून अधिक रुग्ण या शहरात आहेत.









