बेंगळूर/प्रतिनिधी
आयपीएल सामन्यांवर लावण्यात येणाऱ्या बेटिंगचा खेळ राज्यात सुरूच आहे. युएईमध्ये सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यांवर बेटिंग लावल्याच्या आरोपावरून बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी मंगळवारी मल्लेश्वरम येथून दोघांना अटक केली.
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून १३.५ लाख रुपये रोख आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. २२ ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या आयपीएलच्या सामन्यासाठी आरोपी क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होते.
या दोघांनी एका वेबसाइटच्या माध्यमातून या साम्यावर बेटिंग लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचे सह पोलीस आयुक्त पाटील यांनी सांगितले.