बेंगळूर : बिहारमध्ये बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल खरेदी करून त्यांची बेंगळूरमध्ये विक्री करणाऱया टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अशोकनगर पोलिसांनी ही कारवाई केली. सोनूकुमार (वय 32), सुनीलकुमार (वय 32), इरफान (वय 26) सर्व रा. बेंगळूर आणि मुरली विनोद (वय 47 रा. आंध्रप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. होसूर रोडवरील सिमेंट्री रोडवर तिघेजण बेकायदेशीपणे पिस्तूल विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे बुधवारी छापा टाकून या प्रकरणातील चौघांना अटक करून दोन गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, एक मॅग्झिन, दोन दुचाकी आणि पाच मोबाईल, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी बिहारच्या सुलतानगंज येथील लुतनसिंग याच्याकडून पिस्तूल खरेदी करून त्याची बेंगळूरमध्ये विक्री करीत होते, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
Previous Articleनवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षी
Next Article फुले उत्पादक संघटनेचे आज आंदोलन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









