बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर झालेल्या गदारोळादरम्यान, महसूल मंत्री आर. अशोक यांनी सोमवारी बृह बेंगळूर महानगर पालिके (बीबीएमपी) ला एका महिन्यात रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. यावेळी महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.
“२० सप्टेंबरपर्यंत १,३३२ किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि ३० सप्टेंबरपर्यंत प्रभाग स्तरावरील ८५,७९१ लांबीच्या रस्त्यांवर खड्डे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर पाऊस वाढला तर खड्डेही निर्माण होत राहतील आणि ते एकाच वेळी भरले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे पाऊस कमी आहे तोपर्यंत खड्डे भरणे प्रक्रिया सुरु करावी. जेव्हा जल विभाग आणि बेस्कॉम रस्ते खोदतात तेव्हा समस्या उद्भवतात, ” असे अशोक म्हणाले.









