प्रतिनिधी /बेळगाव
लढवय्या देशभक्त, द्रष्टानेता आणि असामान्य संसदपटू बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. यानिमित्त 25 सप्टेंबर रोजी एसकेई सोसायटीच्या गिरी सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता होणाऱया या कार्यक्रमास विनय याळगी, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर आदी उपस्थित राहणार आहेत.









