ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फतव्यांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने उत्तर कोरियातील परकीय प्रभाव दूर करण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि विशेष भाषा वापरल्याबद्दल फाशीच्या शिक्षेपासून तुरुंगवासापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा केला. या कायद्याचे उल्लंघन करत बॅन केलेला चित्रपट केवळ 5 मिनिटांसाठी पाहिल्याने एका 14 वर्षीय शाळकरी मुलाला किम जेंग यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
डेली एनकेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द अंकल’ नामक दक्षिण कोरियन चित्रपट पाहणाच्या आरोपाखाली 7 नोव्हेंबर रोजी एका 14 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली. या विद्यार्थ्याला हायस्टन सिटीतील शाळेतून चित्रपट पाहण्याच्या पाच मिनिटांच्या आतच अटक करण्यात आली. यानंतर त्याला 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
उत्तर कोरियातील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचा गुन्हा केल्यास त्याला कठोर शिक्षेसह 2 लाखांचा दंड आकारला जातो. जर गुन्हा करणारी व्यक्ती 5 ते 15 या वयोगटातील असेल तर त्याला सुधारणात्मक श्रमाची शिक्षा ठोठावली जाते.









