मन्नारच्या आखातात न्यून क्षेत्र स्थिर स्थितीत
पुणे / प्रतिनिधी
श्रीलंकेला धडकून भारतीय किनारपट्टीकडे निघालेले ‘बुरेवी’ चक्रीवादळ मन्नारच्या आखातातच विरले असून, त्याचे येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडूतील रामनाथपुरम तालुका ओलांडत, दक्षिण केरळकडे प्रवास करेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिली.
‘बुरेवी’ 2 डिसेंबरला श्रीलंकेला धडकले असून, त्यानंतर ते मन्नारच्या आखातात उतरले आहे. पुढील 12 तासात त्याची तीव्रता आणखी कमी होणार आहे, तर 24 तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. येत्या 24 तासात रामनाथपुरम पार करत, हे क्षेत्र दक्षिण केरळकडे सरकेल.









