वातावरणातील भरती-ओहोटीचे परिणाम
चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या भ्रमणामुळे वातावरणात सतत महत्त्वाचे बदल होत असतात. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामुख्याने भरती-ओहोटीचा उल्लेख करता येईल. समुद्रकिनारी असणाऱया लोकांना भरती-ओहोटी केव्हा होते याचे परिपूर्ण ज्ञान असते, पण त्याचा वापर कसा करावा हे मात्र माहीत नसते. वातावरणातही सतत भरती-ओहोटी होत असते. 24 तासांपैकी दोनदा भरती आणि दोन वेळा ओहोटी होत असते. काही वेळा भगीरथ प्रयत्न करूनही कामात यश मिळत नाही, सतत कंटाळवाणे वाटते, स्वयंपाक रुचकर होत नाही, साध्यासुध्या कामासाठी मोठा खर्च करावा लागतो, यासह जिथे जिथे नकारात्मकता दिसून येते, तेथे ओहोटीच्या प्रभाव असतो. तर काही वेळा विशेष प्रयत्न न करता एखादं काम पटकन होऊन जाते, दिवसातील काही वेळ अतिशय आनंदी वातावरण असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते, कमी खर्चात मोठी आणि महत्त्वाची कामे होतात अशा वेळेला भरतीचा कालखंड सुरू असतो. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या रोजच्या कालचक्रानुसार हा कालखंड कमी-जास्त होत असतो. रोज त्याच वेळेस भरती अथवा ओहोटी नसते. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे काम करताना वातावरणातील भरती-ओहोटीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्राचीन भारतीय पद्धतीनुसार, तिथीनुसार भरती-ओहोटी केव्हा असते याचे गणित पाहून त्यानुसार त्याचा अंदाज घेता येतो व त्यानुसार कोणते काम केव्हा करावे हीदेखील ठरवता येऊ शकते. जन्माला आलेला एखादा जीव भरतीमध्ये आहे की, ओहोटीतील आहे हे त्याच्या वागणुकीवरून स्वभाव आणि परिस्थिती वरून समजू शकते. पंचांगातील तिथिचे जर ज्ञान असेल तर थोडय़ाशा सरावाने हा कालखंड काढता येऊ शकतो. ज्योतीष शास्त्रामध्ये भरती-ओहोटीला अतिशय महत्त्व दिले आहे. पण त्याचा व्यवहारात कुणीही उपयोग करीत नाही अथवा त्याचे ज्ञान नसते. भरती-ओहोटी ही नैसर्गिक क्रिया असल्यामुळे त्याचे अनुभव चांगले येतात. जर जीवनात तुम्हाला सर्व कार्यात अपयश येत असेल तर ज्या तिथीला जन्माला आला असाल, त्यावेळी भरती -ओहोटीच्या कोणता कालखंड सुरू होता याचे ज्ञान झाल्यास जीवनातील बऱयाच समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. पण यासाठी सखोल अभ्यासाची जरूरी आहे. शिवाय भरती आणि ओहोटीत कोणती कामे करावीत आणि कोणती करू नयेत याचेही शास्त्र असून त्याचाही अभ्यास झालेला कुठेही दिसून येत नाही. 20 -25 वर्षापूर्वी ‘तरुण भारत’ मध्ये आजचे पंचांग या कॉलममध्ये भरती -ओहोटीच्या रोजच्या वेळा देण्यात येत होत्या, हे देखील अनेकांना माहीत असेलच पण लोकांना त्याचे महत्त्व न समजल्यामुळे हे कोष्टक देणे बंद केले होते.
मेष.
राशीत असलेल्या शुक्रामुळे लक्ष्मीयोग होत असून सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभाच्या संधी येतील. रवि-बुध युतीमुळे नावलौकिक, प्रसिद्धी, प्रवास, मंगलकार्य या दृष्टीने अनुकूल काळ आहे. राशीस्वामी मंगळ बदलेपर्यंत कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करा. कर्ज प्रकरणात गुंतू नका. कुणाला जामीन राहू नका. लाभात आलेला गुरु महत्त्वाच्या घडामोडी घडवील. आगामी दोन दिवस शापित योगाचा प्रभाव असल्याने फार दूरचे प्रवास करण्याचे टाळा. तसेच नवे व्यवहार देखील संभाळून करा.
वृषभ
काहीवेळा सहज मिळालेला सल्ला अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. जे इतरांना जमणार नाही, ते या सल्ल्याने यश मिळवून देते असा अनुभव या सप्ताहात येईल. बदललेल्या गुरुमुळे महत्वाच्या घटना घडतील. त्याचा परिणाम आगामी सहा महिन्यापर्यंत राहील. रवी-बुध यामुळे काही संकटे टळतील, पण तरीही कोणत्याही बाबतीत बेसावधपणा नव्या संकटांना आमंत्रण देणारा ठरेल. या आठवडय़ात काही कागदपत्रावर सही करण्याचा प्रसंग येण्याची शक्मयता आहे.
मिथुन
मंत्रशक्ती व आध्यात्मिक बाबतीत अतिशय चांगले फळ मिळेल. रवि-बुधामुळे व्यवहारात काही चांगल्या व माननीय व्यक्तींचा संपर्क येईल. त्यांच्या बुद्धीचा वापर केल्यास जीवनात बरेच काही साध्य करू शकाल. मुळातच तुमची बौद्धिक रास असल्याने कुणाकडून काय शिकावे हे तुम्हाला सांगावे लागत नाही. नोकरी, व्यवसायात बरेच काही चांगले बदल होण्याची शक्मयता आहे. आगामी सहा महिन्यात त्याचा अनुभव येईल, पण महत्त्वाच्या बाबतीत व्यवहारिक राहिला तरच निभाव लागू शकेल.
कर्क
शुक्र-हर्षल योगामुळे अनैतिक प्रेमप्रकरणे निर्माण होण्याची शक्मयता असते. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. रवि-बुध योग आर्थिक बाबतीत काहीतरी निश्चित लाभ देऊन जाईल. बदललेला गुरु जीवनाला नवी कलाटणी देणार आहे. भाग्योदय सूचक अनेक घटना घडतील. आर्थिक लाभाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल. नोकरी-व्यवसायात काही नवीन बदल घडू शकतात, पण त्याचबरोबर गाफीलपणा तसेच अति हौशीपणा काही बाबतीत धोकादायक ठरू शकेल.
सिंह
विवाहस्थानात आलेला गुरु आगामी कालखंडात बरेच संस्मरणीय अनुभव देऊन जाईल. शुक्र-हर्षलचा योग राहत्या वास्तूत काही चमत्कारिक घटना घडवील. नको असलेल्या वस्तू काहीजण गळय़ात पाडवण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाबतीत आपण सावध राहावे. कुत्री, विषारी सरपटणाऱया प्राण्यांपासून जपावे लागेल. नोकरीच्याबाबतीत अपेक्षित कॉल येण्याची शक्मयता आहे. ग्रहमान धनलाभदर्शक आहे. जे काम कराल त्यात आर्थिक फायदा होईल.
कन्या
काहीजणांच्या सांगण्यावरून अथवा त्यांची भरभराट पाहून असलेली नोकरी-व्यवसाय बदलण्याचा प्रयत्न कराल पण, ती धोक्मयाची घंटा आहे. रवि-बुध योगामुळे काही व्यवहार गुप्तपणे करणे योग्य ठरेल. महत्त्वाच्या कामासंबंधी कोठेही वाच्यता झाल्यास त्यात यश मिळणार नाही किंवा ते काम लांबणीवर पडू शकते. शुक्र-हर्षल योग हा अनपेक्षितरित्या प्रेमप्रकरणात अडकण्याची शक्यता. कोण गैरफायदा घेईल सांगता येणार नाही. त्यासाठी माणसे ओळखून वागा. पालकांना काही बाबतीत धाडसी निर्णय घ्यावे लागतील, पण प्रसंगी ते योग्य ठरतील.
तूळ
गेल्या आठवडय़ात बदललेल्या गुरुमुळे सहा महिन्यात तुमच्या जीवनात बरेच महत्त्वाचे फेरबदल घडतील. त्यात काही गोष्टी कल्पनेबाहेरच्या देखील असू शकतात. शुक्र-हर्षलचा योग आर्थिक विवंचना निर्माण करणारा आहे. पैसा भरपूर मिळाला तरी तो हाती राहीलच याची शक्मयता नाही. त्यामुळे कोठेही खर्च करताना योग्य विचारांती करा. रवि-बुधाचे भ्रमण तुमच्या कार्यकर्तृत्वाला पोषक असून मनातील अनेक गोष्टींना मूर्त स्वरूप प्राप्त करून देईल.
वृश्चिक.
कोणाच्या तरी सांगण्यावरून गैरसमज निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहा. काही विचित्र प्रसंगामुळे ठाम निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे महत्त्वाच्या कामाच्या बाबतीत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. चारचौघांच्या सल्ल्यानेच कामे केल्यास उत्तम ठरेल. सहा महिन्यापर्यंत तुम्हाला स्थलांतर, प्रवास, मंगलकार्य, दैवीकृपा यादृष्टीने अनेक बाबतीत मोठे यश मिळणार आहे. डोळय़ांचे विकार निर्माण होतील. काही नव्या किमती वस्तू घेण्यासाठी मोठा खर्च कराल.
धनु
शुक्र-हर्षलचे भ्रमण नव्या मार्गाने धनलाभ घडवून देईल, पण त्याचबरोबर काही नको ती प्रकरणेही निर्माण होतील. त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे. रवि-बुध तुमचे धाडस वाढवेल. अंगच्या कलागुणांना व कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे ग्रहमान आहे. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षित यश मिळेलच असे नाही. वास्तुच्या बाबतीत केलेल्या काही चुका महागात पडण्याची शक्मयता आहे. कायदेशीर बाबतीत कोणत्याही चुका करू नका.
मकर
धनस्थानातील गुरु हा धन लाभास अनुकूल असला तरी काही जणांकडून फसवणूक देखील दर्शवितो. त्यामुळे आपण सर्व बाबतीत संभाळून राहणे आवश्यक आहे. रवि-बुधाचे भ्रमण नोकरी-व्यवसायात काही अनपेक्षित प्रसंग निर्माण करील. तुमच्या हातून जर मागील काळात काही चुका घडल्या असतील तर त्याचा फटका या आठवडय़ात बसू शकेल. बरेच चित्र-विचित्र अनुभव देऊन जाईल. मुलाबाळांच्या बाबतीत आठवडा अतिशय उत्तम आहे. जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर अनुकूल काळ आहे.
कुंभ
राशीतच आलेल्या शुभ गुरुमुळे ‘गजकेसरी राजयोग’ होत आहे. आगामी सहा महिन्यांच्या काळात आर्थिक बाबतीत महत्त्वाच्या घडामोडी घडवील. नोकरी-व्यवसायात अनुकूल फेरफार होऊ शकतात. महत्त्वाची जबाबदारी तुमच्या शिरावर पडण्याची शक्मयता आहे. रवि-बुध म्हणजे हमखास यशाचे प्रतीक, हे या आठवडय़ात सिद्ध होईल. काही महत्त्वाचे व मोठे काम यशस्वी होईल. साडेसातीचा प्रभाव जाणवणार नाही.
मीन.
आपल्याकडे जर चांगले विचार व कल्पना असतील व त्याला प्रोत्साहन देणारी एखादी व्यक्ती भेटल्यास त्याचे सोने करता येते. या सप्ताहात अशा अनेक संधी आपणास मिळतील. सहा महिन्यांच्या कालखंडात तुमच्या आर्थिक व्यवहारात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्मयता आहे. शुक्र-हर्षलचे भ्रमण प्रवासात धोका, गुंगीचे औषध यामुळे नुकसान दर्शवीत आहे. जे काही कराल ते योग्य विचारांती करणे आवश्यक.





