प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाची स्थिती विस्फोटक बनत चालली असून भयानक पद्धतीने कोरोना फैलावत चालला आहे. दर दिवशी कोरोना आपले विक्रम मोडीत काढीत आहे. काल बुधवारी राज्यात तब्बल 198 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा 1259 वर पोचला आहे. अजून 3492 जणांचे चाचणी अहवाल यायचे आहेत.
गोव्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सरकारही कोरोनापुढे हतबल झाले आहे. तीन दिवसांचे लॉकडाऊन आणि 10 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू सरकारने जाहीर केला आहे. वास्कोच्या स्थितीबाबत सरकारवर खापर फोडले जात आहे. मांगोरहिलचा आकडा 78 वर आहे तर मांगोरहिलशी संबंधित आकडा 408 वर पोचला आहे. मांगोरहिलबाबत सुरुवातीपासूनच बेफिकीरी आज संपूर्ण वास्कोतील लोकांच्या जीवावर उठली आहे. वास्कोत कोरोनाने हाहाकार माजविला आहे. तेथे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण गोव्यात आता कोरोना पोहोचला आहे.
आता चिंता भवितव्याची
कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाने सध्या उग्र रुप धारण केले आहे. संपूर्ण गोव्यात कोरोना पसरला आहे. दिवसागणीक कोरोना आपले विक्रम मोडीत काढीत आहे. पुढील काही दिवस ही संख्या वाढणार असा अंदाज सरकारी पातळीवरून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता गोमंतकीयांसमोर भवितव्याची चिंता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटापासून कशी सुटका करायची ही मोठी चिंता लोकांना लागून राहिली असून राज्यात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. वास्कोतील स्थिती भयानक बनली आहे. लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. आज वास्कोच्या विविध भागात 650 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर सर्वाधिक मृत्यू हे वास्को भागातील आहेत. 408 रुग्ण हे मांगोरहिलशी संबंधित आहेत. त्यामुळे गोव्यातील 1058 रुग्ण हे मांगोरहिलमुळे तयार झाले आहेत. मांगोरहिलवर लक्ष केंद्रीत करून सरकारने अगोदरच निर्णय घेतला असता तर ही स्थिती राज्यात निर्माण झाली नसती, असा दावा जनता करीत आहे.
अधिक रुग्णसंख्या असलेले भाग
सडा 98
बायणा 124
नववाडे 107
झुवारीनगर 157
खारीवाडा 86
टय़ुलीप वेर्णा 136
चिंबल 93
कुडतरी 37
खांडोळा 40
मडगाव 16
केपे 17
लोटली 26
इंदिरानगर 39
सांखळी 25
फोंडा 49
वाळपई 19
शिरोडा 18
पेडणे 12
मंडूर 13
धारबांदोडा 11
कुंकळ्ळी 27
नेरुल 23
करासवाडा 16
गोव्यात 15 जुलैपर्यंत कोरोनाबाधित 2951
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 1674
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण 1259
15 जुलै रोजीचे नवे रुग्ण 198
15 जुलै रोजी बरे झालेले रुग्ण 67
आतापर्यंतचे मृत्यू 18









