प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. बुधवारी तब्बल 6,976 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 35 जणांचा बळी गेला आहे. तर 2,794 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 49,254 बाधितांवर उपचार केले जात आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 10,33,560 इतकी झाली असून 9,71,556 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 12,731 इतका आहे.
गेल्या 24 तासात बेंगळुरात 4,991 नवे रुग्ण आढळून आले असून 1,782 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी दिवसभरात 1,25,390 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6,976 जण बाधित झाले आहेत.









