प्रतिनिधी / सांगली
बुधगाव गावामधील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचचे गेल्या अनेक वर्षांपासून हाल होत आहेत. तसेच बुधगाव गावामध्ये असणार्या बोअर (कूपनलिका) HB जवळ जवळ ३५ ते ४० दिवस बंद अवस्थेत आहेत. यामधील बऱ्याच कूपनलिककेवर असणारे हातपंप, पाईप, नेज्जर इतर बरेच साहित्य गंजल्यामुळे, सदल्यामुळे, या सर्व बोर बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बुधगांव मधील नागरिकाचे, विशेषतः महिला वर्गाना यांचा प्रंचड नाहक त्रास होत आहे. म्हणून या सर्व बोर तातडीने दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी सांगली जि. प. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्याकडे बुधगांव पंचायत समिती सदस्य विक्रम भाऊ पाटील, सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सांगली भाजपा ओ.बी.सी सेलचे उपाध्यक्ष दिलावर पठाण, मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजित गावडे, अभिजित पाटील यांनी केली.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी तातडीने जि.प.पाणीपुरवठा व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून बुधगावमधील सर्व नादुरूस्त बोअरचे तातडीने इस्टिमेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.








