अभिनेत्री कंगना रनौतकडे ‘धाकड’ समवेत अनेक चित्रपट आहेत. अभिनेत्री सध्या आगामी ऍक्शन चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी बुडापेस्टमध्ये आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर बुडापेस्ट येथील रम्य परिसराचा आनंद घेतानाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. बुडापेस्ट येथे अभिनेता अर्जुन रामपाल देखील चित्रिकरणासाठी दाखल झाला आहे. धाकड चित्रपटाचे यापूर्वी मध्यप्रदेशात चित्रिकरण झाले होते. याचे दिग्दर्शन रजनीश घई करत आहे. बुडापेस्टमध्ये उर्वरित चित्रिकरण सुरू आहे.
याचबरोबर कंगनाकडे ‘थलाइवी’समवेत अनेक चित्रपटत आहेत. ती अरविंद स्वामी आणि अन्य अभिनेत्यांसोबत जे. जयललितांच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याचबरोबर ती तेजस चित्रपटातूनही झळकणार आहे.
कंगना सोशल मीडियावर अनेक कलाकारांशी ‘पंगा’ घेत असते. विशेषकरून करण जोहरच्या गटातील कलाकारांना ती वारंवार लक्ष्य करत असते. कंगनाने आता अभिनेत्री प्रियांका चोप्राला लक्ष्य केले आहे. प्रियांकाला तिने सेक्युलर पपी संबोधिले आहे.









