बेळगाव / प्रतिनिधी
मागील काही वर्षांपासून रिक्त राहिलेले बुडाचे अध्यक्षपद आता भाजपचे नेते गुळाप्पा होसमनी यांना बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे बुडा अध्यक्षपदाला दीर्घकाळानंतर मानकरी लाभला आहे. बुडाचे नूतन अध्यक्ष म्हणून होसमनी यांनी शुक्रवारी कार्यभार स्विकारला.









