प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलला 2021 वर्षातील एनसीसी सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एनसीसीच्या कर्नाटक, गोवा, निर्देशनालयातर्फे ज्यु. एनसीसीतील ज्युनियर डिव्हिजन विभागातील 2021 सालातील संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये प्रथम क्रमांक व सर्वोत्तम शाळेचा बहुमान देण्यात आला.
रविवारी बेंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्नाटक व गोवा एनसीसीचे प्रमुख एअर कमांडर भुपेंदरसिंग कंवर यांच्या हस्ते चषक देण्यात आला. बेळगावचे एनसीसी ग्रुप कमांडर कर्नल के. श्रीनिवास, 25 कर्नाटक एनसीसी बटालियनचे प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल नंदकुमार, बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शैला चाटे, एनसीसी अधिकारी रवी घाटगे यांनी पुरस्कार स्वीकारला. 25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सहानी, संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सचिव शिवनगी, अरविंद हुनगुंद यांचे मार्गदर्शन मिळत आहे.









