वार्ताहर /किणये
तारानगर, पिरनवाडी येथील शिवानी दळवी हिने बी. ई. इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये 93.85 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालय यांच्यावतीने जुलै-ऑगस्टमध्ये बी. ई. इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेतील बी. ई. मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स विभागामध्ये के. एल. ई. डॉ. एम. एस शेषगिरी कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामध्ये शिवानी प्रल्हाद दळवी हिने 93.85 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच नोकरीसाठी आयटी कंपनी एक्सचेंजर व आय. लिंक या कंपन्यांमध्ये तिची कॅम्पसमध्ये निवड झालेली आहे. यापूर्वी तिने विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकाविले असून ती किणये मराठी शाळेचे शिक्षक पी. जी. दळवी यांची कन्या आहे.









