ऑनलाइन टीम / मुंबई :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2019-20 या वर्षासाठी क्रिकेटपटूंसोबतचे करार जाहीर केले आहेत. महेंद्रसिंग धोनी याला या करारात कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या वषी धोनीला ‘ए ग्रेड’ मध्ये स्थान देण्यात आले होते, पण यंदा मात्र त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.
दरम्यान ग्रेड ‘ए प्लस’ मध्ये म्हणजे सर्वाधिक मानधन मिळणाऱया क्रिकेटपटूं मध्ये कर्णधार विरोट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘ए ग्रेड’ मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्मय रहाणे, के. एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तर ‘ग्रेड सी’ मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.
दरम्यान, ‘ए प्लस’ मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना 7 कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी तर
‘ग्रेड सी’ मधील खेळाडूंना 1 कोटी मानधन दिले जाईल.