ऑनलाईन टीम : बीरभूम
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई गावात तीन महिला आणि दोन मुलांसह आठ जणांना जिवंत जाळण्यापूर्वी बेदम मारहाण करण्यात आली होती,असे त्यांच्या शवविच्छेदन तपासणीत उघड झाले आहे.
मंगळवारी पहाटे अज्ञात लोकांनी झोपडीवजा घरांना आग लावली होती. घरांमधील जळलेल्या मृतदेहांच्या चाचण्या करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, पीडितांना प्रथम बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर जाळण्यात आले
या घटनेनंतर आतापर्यंत किमान 20 लोकांना अटक करण्यात आली असून, सोमवारी संध्याकाळी स्थानिक TMC नेत्याच्या हत्येमुळे हे घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. अनेक पोलीस कर्मचारी आणि नागरी अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाच्या कारणास्तव काढून टाकण्यात आले आहे.









