बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगरपालिके (बीबीएमपी) चे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट शुक्रवारी सकाळी काही तासांसाठी हॅक झाले.
हॅकरने ट्विटर अकाऊंटवर अधिकृत फोटो आणि नाव बदलून ‘गौरव गुप्ता’ वरून ‘टीएसएलए’ केले आणि क्रिप्टोकर्न्सीवरील काही ट्वीट पोस्ट केली गेली.
दरम्यान, नंतरट्विटर अकाऊंटचे नाव बदलून ‘-’ केले गेले. बीबीएमपीच्या सूत्रांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी बेंगळूर आयुक्त यांचे अकाऊंट हॅक झाले आहे आणि ते परत मिळविण्याच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान ट्विटर अकाउंट हॅकसंदर्भात बीबीएमपीच्या अधिकृत विधानाची प्रतीक्षा आहे.










