बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण प्रक्रियेचा आणि बेड्स क्षमतेचा आढावा घेण्यासाठी बीबीएमपीचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी आज व्हिक्टोरिया हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी आयुक्तांनी जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीच्या उपायोजना राबविण्याच्या सूचना केल्या.
तसेच अतयुक्तांनी यावेळी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता डॉक्टरांना लसीकरण दर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेड्सची कमतरता भासू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले.









