2022 बांगलादेश प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेतून वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने पाठ दुखापतीमुळे माघार घेतली. या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात तस्कीन सहभागी होणार नसल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिली.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदला पाठ दुखापतीच्या समस्येमुळे चांगलेच त्रासले होते. सदर दुखापत पूर्णपणे बरी होण्यास काही कालावधी लागत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीपीएल स्पर्धेत तस्कीन अहमद सिलेत सनरायजर्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो त्याने या स्पर्धेत 4 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. सिलेत सनरायजर्स संघाने तस्कीनच्या जागी एकेएस स्वाधीनची निवड केली अफगाणविरुद्ध होणाऱया आगामी वनडे मालिकेत तस्कीन अहमद खेळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. बांगलादेश आणि अफगाण यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका चित्तगाँगमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने 23, 25, 28 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर ढाक्यात उभय संघातील पहिला टी-20 सामना 3 मार्चला तर दुसरा टी-20 सामना 5 मार्चला खेळविला जाणार आहे.









