वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ऍथलीट्स आयोग सदस्यपदी भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुने यापूर्वी सलग दोनवेळा ऑलिंपिक स्पर्धेत पदके मिळविली आहेत.
26 वर्षीय पी.व्ही. सिंधुने यापूर्वी विश्वविजेतेपद मिळविले होते. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ऍथलीट्स आयोगामध्ये सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यपदाचा कालावधी 2025 पर्यंत राहील. ऍथलीट्स आयोगामध्ये आता अमेरिकेची इरिस वेंग, हॉलंडचा रॉबिन टँबलिंग, इंडोनेशियाची ग्रेसिया पॉली, कोरियाची कीम सोयाँग, भारताची पी.व्ही. सिंधू आणि चीनची झेंग वेई यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.









