वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल डीलर्स मंडळ (फाडा) यांनी बीएस-4 प्रणाली असणाऱया वाहनांच्या नोंदणीसाठी अधिकची सवलत मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सादर केलेल्या याचिकेमध्ये बीएस-4 वाहनांची विक्री आणि नोंदणीसाठी 31 मे 2020 पर्यंत सवलत मिळावी यासाठीची मागणी केली आहे. कारण देशात 1 एप्रिल 2020 पासून बीएस-6 ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या अगोदरच सवलत मिळावी यासाठी फाडाने ही याचिका दाखल केली आहे.
या पार्श्वभूमीवर वाहन निर्मिती कंपन्यांना 31 मार्चपर्यंत बीएस-4 प्रणाली असणाऱया वाहनांची विक्री करण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे. 31 मार्चनंतर बीएस-4 या वाहनांची नेंदणी करण्यात येणार नाही. यासाठीच वाहन निर्मिती कंपन्या वाहन विक्री आणि नोंदणीसाठी दोन महिन्याची सवलत मागत आहेत. कारण बीएस-4 प्रणाली असणारी वाहनांचा साठा संपविण्याची धास्ती या कंपन्यांनी घेतली आहे.
देशभरात सध्य स्थितीत बीएस-4 वाहनांचा साठा जवळपास 8.35 युनिट इतका आहे. यांची सरासरी किंमत 4,600 कोटी रुपये असल्याचीही माहिती आहे. प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहनांचा बीएस-4 चा साठा कमी कालावधीतच संपणार असल्याचे काले यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे विक्री ठप
कोरोनाचा वाढता विळखा कमी होण्याचे चित्र सध्या काय दिसत नाही त्यामध्येच सर्व देशातील व्यापार उद्योग ठप झाले आहेत. यामध्येच जास्तीत जास्त वाहनांचे दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. यामुळे विक्रीत 60 ते 70 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. असे फाडाचे अध्यक्ष आशीष हंसराज काले यांनी सांगितले आहे.









