23 मधील 14 क्षेत्रात घसरण : रिअल इस्टेटमध्ये मोठी घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
सप्ताहामधील पहिल्या दिवशीच्या समभागधारकांना काहीशी चिंता करायला लावणारी गोष्ट निर्माण झाली आहे. कारण सोमवारी पहिल्या सत्रात बाजारात घसरण राहिली. बाजारबंद होताना सेन्सेक्स 469.60 अंकांनी घसरुन 30,690.02 आणि निफ्टी 118.05 अंकांनी घसरुन 8,993.85 वर बंद झाला. घसरत्या बाजाराचा परिणाम बीएसईमधील निवडक क्षेत्रांवर झाल्याचे दिसून आले. यात वाहन क्षेत्रातील समभागांची अधिकची घसरण झाली. टीक्हीएस मोटारचे समभाग सर्वाधिक 5.12 टक्क्मयांनी घसरले आहेत. यासोबत बाळकृष्ण इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, हीरोमोटो लिमिटेड, एक्साइड इंडिया, अमरा राजा बॅटरी, अपोलो टायर्स, मदरसन सुमी सिस्टम, एमआरएफ टायर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि टीक्हीएस या कंपन्यांचाही घसरणीत समावेश झाला आहे.
बीएसई क्षेत्रात चढउतार
बीएसईमधील सर्व क्षेत्रांच्या कामगिरीत चढउताराचे वातावरण राहिले होते. यातील 9 क्षेत्रात सर्वाधिक वाढ आणि 14 क्षेत्रात घसरण राहिली आहे तर वाहन, बँकिंग क्षेत्रातील समभागात सर्वाधिक घसरण झाली आहे.
बीएसईमधील कंपन्या
2,601 कंपन्यांसोबत समभागांमध्ये टेडिंग झाले. यात 1,205 कंपन्यांचे समभाग वधारले आहेत आणि 1,184 कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. 31 कंपन्यांचे समभाग 1 वर्षाच्या उच्चांकावर आणि 126 कंपन्यांचे समभाग एक वर्षाच्या निम्म्यावर आले आहेत.









