कारमध्ये अत्याधुनिक सुविधा : उत्पादन चेन्नईच्या कारखान्यातून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जर्मनची लक्झरी कार निर्मिती कंपनी बीएमडब्लूने भारतात आपली स्पार्ट युटिलिटी वाहनांमधील एक्स-1 हे अपडेटड मॉडेल नुकतेच सादर केले आहे. या मॉडलची किंमत 35.9 लाख ते 42.9 लाख या दरम्यान असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या कारचे पुनर्निर्माणाचे काम कंपनीच्या चेन्नईमधील कारखान्यातून करण्यात आले आहे. या मॉडेलचे डिझाइन बीएस-6 प्रणालीवर असून पेट्रोल व डिझेल पावरट्रेनमध्ये सात व आठ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनची सुविधा मिळणार आहे.
इंजिन : नवीन बीएमडब्लू एक्स-1 कार 2 लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. जो 192 एचपीपेक्षा अधिक पॉवर जनरेट करणार आहे. कार 7.7 मध्ये शुन्य ते 100 किमी प्रतितास वेगात कार धावणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. याच प्रकारे 2 लिटर चार सिलेंडर डिझेल इंजिन असणारे मॉडेल 190 एचपीची पॉवर जनरेट करणार असून ती 7.9 सेंकदात शुन्य ते 100 किमीचे अंतर पार करणार आहे. कंपनीचा दावा आहे, की पेट्रोल इंजिन 14.82 किमीच्या वेग पकडत डिझेल इंजिन 19.62 किमी प्रति लिटर मायलेज देणार असल्याचे म्हटले आहे.
फिचर : सदर कारमध्ये 8.8 इंच आकाराचा सेंट्रल डिस्प्लेसोबत टच स्क्रीनची सुविधा देण्यात येणार आहे. यासोबतच ऍप्पल कारप्ले, ऑटो स्टार्ट स्टॅप, ब्रेक एनर्जी, 6 एअर बॅगचीही सोय मिळणार आहे.
किमती मॉडेलप्रमाणे
पेट्रोल मॉडेल : 35.9 लाख ते 38.7 लाखपर्यंत
डिझेल मॉडेल : 39.9 लाख ते 42.9 लाखापर्यंत









