पहिल्यांदाच 59 दिवसांत जोजिला खिंड खुली – यापूर्वी 150 दिवसांपर्यंत बंद असायचा मार्ग
वृत्तसंस्था/ श्रीनगर
11,650 फुटांच्या उंचरीवल जोजिला खिंड रविवारी विक्रमी 69 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जोजिला ही एक सामरिकदृष्टय़ा महत्त्वाची खिंड असून तेथूनच जम्मू-काश्मीरचा लडाखशी रस्तेसंपर्क होऊ शकतो. सर्वसाधारणपणे हिमवृष्टीनंतर दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्याला हा मार्ग बंद करण्यात येतो. तर मार्चच्या दुसऱया आठवडय़ापासून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हा मार्ग खुला करण्यात येतो. पण यंदा बॉर्डर रोड्स ऑर्गनायजेशनने (बीआरओ) 59 दिवसांत खिंड खुली करून इतिहास रचला आहे.
जोजिला खिंड सर्वसाधारणपणे 90 ते 150 दिवसांपर्यंत बंद राहते. चीनसोबत तणावानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तैनात सैन्याने वाढविली आहे. सैनिकांसाठी रसदसहाय्य कायम ठेवण्यासाठी जोजिला खिंड लवकर खुली करण्यात आली आहे. मागील वर्षी 31 डिसेंबर रोजी हा मार्ग बंद करण्यात आला होता.
हिमवृष्टीदरम्यान लडाख-श्रीनगर महामार्गावर 30 ते 40 फूट जाडीचा बर्फाचा थर जमा होतो. तसेच तापमान उणे 30 अंश सेल्सिअसपर्यंत खालावते. यादरम्यान लडाखचा देशाच्या उर्वरित भागाशी असलेला रस्तेसंपर्क तुटतो. पण यंदा बीआरओने केवळ 14 दिवसांमध्ये सोनमर्ग ते गुमरीपर्यंतच्या 26 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील बर्फ हटवून अनोखा विक्रम केला आहे.









