बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रशासन सर्व स्तरावर कोरोनाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगत आहे. तसेस राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांना बेङची कमतरता भासत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसरकार बेंगळूर शहराच्या हद्दीत बेंगळूर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (बीआयईसी) येथे कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करत आहे. या ठिकाणी कर्नाटकमधील सर्वात मोठी सुविधा इथे देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या कोविड केअर सेंटर विषयी माहिती दिली.
याठिकाणी पाच हॉलमध्ये बेड्स असणार आहेत. तसेच प्रत्येक १०० रूग्णांसाठी एक डॉक्टर, दोन परिचारिका, एक सहाय्यक कर्मचारी, एक स्वच्छता कर्मचारी आणि दोन बीबीएमपी मार्शल हे बीआयईसी येथे सेवेसाठी असतील, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे.